
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
महिला आरक्षण विधेयक काल (दि.19) लोकसभेच्या विशेष अधिवेशनात (Parliament Special Session) मांडण्यात आले. यावर आज विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. या विधेयकाला काँग्रेसकडून समर्थन असल्याचे सोनिया गांधी (Sonia gandhi) यांनी लोकसभेत जाहीर केले आहे...
हे विधेयक दिवंगत पंतप्रधान आणि माझे पती राजीव गांधी (Rajeev Gandhi) यांनी आणले होते. त्यामुळे हा क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय हृदयस्पर्शी क्षण असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. हे विधेयक मंजूर झाल्यावर राजीव गांधींचे अधुरे स्वप्न पूर्ण होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
महिला आरक्षण (Women Reservation) विधेयकावर बोलताना सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाल्या की, भारतीय महिलांमध्ये हिमालयासारखा संयम असून, नव्या भारताच्या उभारणीत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. महिला कधीही संकटांच्या ओझ्याखाली दबली गेलेली नाहीत. इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व हे त्याचे उदाहरण आहे. या विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.