<p>नवी दिल्ली</p><p>सीमेसंदर्भात भारत आणि चीनचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. सीमा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. चीनच्या प्रत्येक पावलास भारताने जशाच तसे उत्तर दिले आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.</p>.<p>राज्यसभेत बोलतांना राजनाथसिंह म्हणाले, देशहितासाठी आम्ही कोणतेही पाऊल उचलू शकतो व कोणतीही मोठा निर्णय घेऊ शकतो.चीनने अजूनही भारतीय भूभागावर अवैधरित्या कब्जा केला आहे. चीनने सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली आहे. भारतानेही कोणत्याही परिस्थितीची तयारी केला आहे. सीमेत (LAC)बदल करण्याचा चीनचा प्रयत्न आमच्या जवानांनी हाणून पाडला. आमच्या लष्कराचे मनोधर्य चांगले आहे. दुर्गम ठिकाणांवर आपले जवान सीमेवर पाय घट्ट रोवून बसले आहे. विषम परिस्थित आपले जवान कार्यरत आहेत. आमच्या जवानांनी संयम ठेऊन काम केले आहे. भारत सर्व प्रश्न चर्चेने सोडवण्यास तयार आहे.</p>