तळेगांव दिंडोरी ग्रामपंचायतीवर परिवर्तनची सत्ता

शिंदे गटाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे गटाचा पराभव
तळेगांव दिंडोरी ग्रामपंचायतीवर परिवर्तनची सत्ता

ओझे l वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) तळेगांव दिंडोरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchayat Election) एकूण 10 जागांपैकी सरपंच व सदस्य अशा 8 जागांवर परिवर्तन पॅनलचे माजी सरपंच कै. सुकदेव पाटील कथार यांचे चिरंजीव युवा नेतृत्व प्रविण कथार, माजी उपसरपंच सुदाम अण्णा ढाकणे यांचे पुतणे प्रशांत ढाकणे, माजी सरपंच अजय चारोस्कर व सागर चकोर यांचा पॅनल विजयी झाला आहे. तर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे व माजी उपसरपंच गोकुळ चौधरी यांच्या ग्रामविकास पॅनलला दोन जागांवर विजय प्राप्त करता आला आहे...

सरपंच पदासाठी (अनु.जमाती महिला) सोनाली अजय चारोस्कर 1055 विजयी (परिवर्तन) विजयी व वैशाली अनिल चारोस्कर 620 (ग्रामविकास) पराभूत झाल्या आहेत.

सदस्य पदासाठी निवडणूक

प्रभाग क्रमांक 1

अनुसूचित जाती गटातून अतिष सुरेश आवारे 303 (परिवर्तन) पराभूत व दिनकर रामचंद्र भडदिवे 313 विजयी (ग्रामविकास)

अनुसूचित जमाती महिला गटातून आशा सचिन चारोस्कर 313 विजयी (परिवर्तन) व सुवर्णा योगेश चारोस्कर 303 पराभूत (ग्रामविकास)

सर्वसाधारण महिला- गटातून सौ भारती प्रभाकर ढाकणे 296 पराभूत (परिवर्तन) व स्वाती संदीप चौधरी 323 विजयी (ग्रामविकास)

प्रभाग क्रमांक 2

अनु.जमाती गटातून लखन पंढरीनाथ चारोस्कर 422 विजयी (परिवर्तन), दौलत हिरामण वाघे 68 पराभूत (ग्रामविकास)

सर्वसाधारण गटातून प्रवीण सुकदेव कथार 481 विजयी (परिवर्तन), राजेंद्र दत्तात्रय चौधरी 60 पराभूत (ग्रामविकास)

अनुसूचित जमाती महिला गटातून गायत्री मच्छिंद्र मिसाळ 450 विजयी (परिवर्तन) व मथुराबाई रामनाथ जाधव 81 पराभूत (ग्रामविकास)

तळेगांव दिंडोरी ग्रामपंचायतीवर परिवर्तनची सत्ता
नाशिक तालुक्यात सरपंचपदासाठी 'यांनी' उधळला विजयाचा गुलाल, पाहा संपूर्ण निकाल

प्रभाग क्रमांक 3

अनुसूचित जमाती गटातून अमोल सदाशिव जाधव 283 विजयी (परिवर्तन), संजय मारुती कराटे 220 पराभूत (ग्रामविकास)

अनुसूचित जमाती महिला राखीव गटातून जिजा बाळू चारोस्कर 305 विजयी (परिवर्तन) सुरेखा चंद्रकांत गांगुर्डे 211 पराभूत (ग्रामविकास)

सर्वसाधारण महिला गटातून सौ सारिका सागर चकोर 313 विजयी (परिवर्तन) सौ शोभा बाबुराव चौधरी 198 पराभूत (ग्रामविकास)

तळेगांव दिंडोरी ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली युवक, ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

निवडणूक विशेष

१) ग्रामपंचायत सदस्य जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दिंडोरी तालुक्यातून 421 मतांची आघाडी घेत प्रवीण सुकदेव पाटील कथार यांनी विजयी प्राप्त केला असून विरोधी पॅनलचे उमेदवार राजेंद्र चौधरी यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

२) या निवडणुकीत विकास कामाची दृष्टी समोर ठेवून अनिल आव्हाड यांनी किंगमेकरची भूमिका बजावली. तर संतोष कथार यांनी सूक्ष्म नियोजन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com