परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची लगीनघाई; लवकरच उरकणार साखरपुडा!

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची लगीनघाई; लवकरच उरकणार साखरपुडा!

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा (Actress Parineeti Chopra) आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) खासदार राघव चड्ढा (MP Raghav Chadha) यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉटही केले गेले आहे. त्यामुळे आता लवकरच दोघांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची लगीनघाई; लवकरच उरकणार साखरपुडा!
नाशकात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे दोघे साखरपुडा करणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी दोघांच्याही घरी जय्यत तयारी सुरू असल्याचे समजते. त्यांच्या या साखरपुडा समारंभाला कुटुंबिय आणि मित्रपरिवार असे मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्राही (Priyanka Chopra) पती निक जोनस (Nick Jonas) व मुलगी मालती मेरीसह भारतात आली आहे. या दोघांनी परिणीतीच्या साखरपुडा समारंभाला उपस्थितीत राहू शकतील अशा पद्धतीनेच भारतातील ट्रिपचे नियोजन केल्याचे समजते.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची लगीनघाई; लवकरच उरकणार साखरपुडा!
खासदार संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले...

दरम्यान, परिणीती आणि राघव त्यांच्या नात्याविषयी अद्याप मौन बाळगून आहेत. तसेच दोघांच्या कुटुंबातील कुणीही अद्याप साखरपुडा समारंभाबाबत आणि त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तर त्यांच्याशी संबंधित अनेकांनी देखील दोघांच्या नात्याला दुजोरा दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com