Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशाळा विलिनीकरणाने पालक संतप्त; केंद्रप्रमुखांना भरसभेत मारहाण

शाळा विलिनीकरणाने पालक संतप्त; केंद्रप्रमुखांना भरसभेत मारहाण

घोटी। वार्ताहर Ghoti

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) पुनर्वसित गाव दरेवाडी येथील शाळा ( Darevadi School )बंद करून अन्य शाळेत समायोजन करण्याचे पत्र पालक सभेत वाचून दाखवणार्‍या केंद्रप्रमुखांना संतप्त पालकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

या बाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यात दरेवाडी हे धरणामुळे विस्थापित गाव असून ह्या गावातील शाळा बंद करून अन्य शाळेत विद्यार्थी समायोजन करावे असे पत्र जिल्हा परिषदेकडून आले आहे. गेल्या महिन्यात शाळा बंद करू नये यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केेले होते. आज सकाळी अकरा वाजता आलेल्या पत्राचे वाचन प्रभारी केंद्रप्रमुख माधव उगले यांनी केले. यावेळी उपस्थित बाळू देवराम गांगड याने त्यांना मारहाण केलीे. त्यांच्यावर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जबाबदार कोण?

शाळा बंद करू नका म्हणून इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांनी पायपीट करून निवेदन दिले होते. त्यावेळी गट शिक्षण अधिकार्‍यांनी शाळा हलवली जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते.मात्र आज झालेल्या सभेत गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विस्ताराधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांनी माधव उगले यांना संतप्त पालकांमध्ये शाळा बंद करण्याचे पत्र वाचायला लावले. ह्यामुळे आक्रमक पालकांकडून विद्यार्थ्यांची खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्यामुळे अशी चुकीची घटना घडली

- Advertisment -

ताज्या बातम्या