मुंबई | प्रतिनिधी

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये संकलित करण्याचे टार्गेट दिले होते. असा खळबळजनक आरोप मुंबई पोलीस महानिरीक्षक पदावरून उचलबांगडी झालेल्या परमवीर सिंग यांनी केले आहेत...

आज मुख्यमंत्र्यांना त्यांनी एक पत्र पाठवले असून यात हे खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. स्वतःला वाचविण्यासाठी परमवीर सिंग यांनी हे पत्र पाठवले असावे असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

राजकीय वर्तुळात या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, परमवीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रात मुंबईत १७५० बार आहेत. यांच्याकडून २-३ लाख रुपये जरी दरमहा जमा केले तरीदेखील ४०-५० कोटी सहज होतील असे सांगितले होते.

तसेच गृहमंत्री ज्ञानेश्वरीवर सचिन वाझे यांना बोलवत होते. तसेच त्यांना हे टार्गेट देण्यात आल्याचे पत्रात म्हटले असल्याचे समजते.