Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक कृउबा निवडणूक : पिंगळेंच्या नेतृत्त्वाखाली पॅनल जाहीर; 'हे' आहेत उमेदवार

नाशिक कृउबा निवडणूक : पिंगळेंच्या नेतृत्त्वाखाली पॅनल जाहीर; ‘हे’ आहेत उमेदवार

नाशिक | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक (Nashik APMC Election) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी दाखल ११ पैकी ९ उमेदवारांनी (Candidates) माघार घेतल्याने या जागांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली आहे…

- Advertisement -

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरात लष्कराच्या वाहनाला आग

नाशिक कृउबा समितीच्या या निवडणुकीत पिंगळे गटाने सरशी घेत १८ पैकी ३ जागा बिनविरोध करत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. त्यानंतर आता देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या नेतृत्त्वाखाली एक पॅनल बाजार समितीच्या निवडणुकीत उतरला असून पुढील आठ दिवस प्रचाराच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे गाजताना दिसणार आहे.

Video : सिन्नर तालुक्यात गारपीट; शेतकऱ्यांची तारांबळ

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०२३-२०२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी देविदास पिंगळे, संपत सकाळे, बहिरू मुळाणे, युवराज कोठुळे, तुकाराम पेखळे, उत्तम आहेर, उत्तम सिताराम खांडबहाले यांनी सोसायटी सर्वसाधारण गटातून तर दिलीप थेटे यांनी सोसायटी इतर मागास वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Video : निफाडचे आंदोलक शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना

त्याबरोबरच विश्वास नागरे यांनी सोसायटी वि.जा.भ.ज. तर सविता संजय तुंगार आणि विजया विलास कांडेकर यांनी सोसायटी महिला गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच जगन्नाथ कटाळे व विनायक माळेकर यांनी ग्रामपंचायत सर्वसाधारण गटामधून तर निर्मला कड यांनी ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गट आणि भास्कर गावित यांनी ग्रामपंचायत अनु.जाती-जमाती गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या