क्रिकेट बेतले जीवावर; खेळाडूच्या गुप्तांगाला लागला चेंडू

क्रिकेट बेतले जीवावर; खेळाडूच्या गुप्तांगाला लागला चेंडू

पंढरपूर | वृत्तसंस्था Pandharpur

क्रिकेट (Cricket) तसा सर्वांचाच आवडता खेळ. जिथे जागा मिळेल तिथे तरुणाई क्रिकेट (Cricket) खेळताना दिसते. मात्र राज्यातील पंढरपूर तालुक्यात (Pandharpur) येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. फलंदाजाच्या गुप्तांगाला वेगवान चेंडू लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे....(pandharpur 35 year old young boy died as ball hits him hard on his private part)

विक्रम क्षीरसागर (Vikram Kshirsagar) असे या मृत फलंदाजाचे नाव आहे. तो ३५ वर्षांचा होता. विक्रमच्या मृत्यूप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात (Pandharpur Taluka Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंढरपूरमधील तावशी (Tavashi Pandharpur) गावात ही घटना घडली.

अनेकदा क्रिकेट (Cricket) खेळताना दुर्घटना घडल्याचे दिसून येते. हृदयविकाराच्या धक्क्याने याआधी काही तरुणांवर काळाने घाला घातल्याचे प्रकार समोर आले होते. आता गुप्तांगावर चेंडू लागल्याने क्रिकेटप्रेमींना (Cricket Lover) धक्का बसला आहे.

क्रिकेट खेळताना हेल्मेट (Cricket), पॅड (Pads), आणि सुरक्षेच्या इतर साधनांसह फलंदाजी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबत (International Cricket) राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्येही (National Cricket Competition) आता फलंदाजांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात असले तरी ग्रामीण भागात या सुविधांचा अभाव आहे. याबाबत जनजागृतीदेखील झालेली बघायला मिळत नाही.

त्यामुळे सेफ्टी फर्स्ट (Safety First) म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन क्रिकेट प्रशिक्षकांकडून केले जात आहे.

तावशी (Tavashi Village) गावात स्थानिक पातळीवरचे सामने खेळवले जात होते. यादरम्यान विक्रम हा फलंदाजीसाठी उतरला होता. नेपातगाव या गावच्या संघाकडून विक्रम फलंदाजी करत होता. मात्र, वेगवान चेंडूचा विक्रमला अंदाज आला नाही. हा चेंडू थेट विक्रमच्या गुप्तांगाला लागला. यानंतर विक्रमचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान, दोन्हीही संघाच्या खेळाडूंनी घटनास्थळी हंबरडा फोडल्याचे दिसून आले. खेळाडूंनी क्रिकेट सामना खेळताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन क्रिकेट प्रेमी आणि प्रशिक्षकांकडून करण्यात येत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com