मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून पाकिस्तानी बोट जप्त

मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून पाकिस्तानी बोट जप्त

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)बुधवारी पंजाबमध्ये फिरोजपूर येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी जाणार होते. त्यावेळी आंदोलकांनी पंतप्रधानांचा ताफा २० मिनिटं थांबला होता. त्या परिसरात असलेल्या सतलज नदीतून (sutlej river)पाकिस्तानी बोट जप्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणापासून पाकिस्तानची बॉर्डर (Pakistan border)केवळ 10 किमीवर होती, असे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदरसिंग यांनी म्हटलं होता.

मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून पाकिस्तानी बोट जप्त
श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले...

भारत-पाकिस्तान सीमेवरील सतलज नदीत ममदोत परिसरातून एक पाकिस्तानी बोट सापडली आहे. या बोटीतून भारतीय हद्दीत कोणी घुसले का? याचा तपास सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि स्थानिक पोलीस करत आहेत. सतलज नदी पंजाबला लागून असलेल्या भारत-पाक सीमेवर वाहते. बीएसएफला ही बोट ममदोतजवळील बीओपी डीटी माळजवळ शुक्रवारी सापडली आहे. ही बोट पाहून बीएसएफ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बोटीतून काहीही सापडले नसले तरी ज्या ठिकाणाहून ही बोट सापडली त्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. बीएसएफने आजूबाजूच्या गावातील लोकांचीही चौकशी केली आहे. याबाबत स्थानिक पोलीसही तपास करत आहेत. ममदोत परिसरात अनेक तस्कर सक्रिय आहेत. येथून शस्त्रास्त्रे आणि हेरॉईनची अनेक खेप जप्त करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com