Asia Cup 2022 : पाकिस्तान-हाँगकाँग आज भिडणार

Asia Cup 2022 : पाकिस्तान-हाँगकाँग आज भिडणार

शारजाह | Sharjah

आशिया चषकात (Asia Cup) आज शुक्रवारी हाँगकाँग (Hong Kong) संघाचा सामना पाकिस्तान (Pakistan) संघाशी होणार आहे. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे...

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला सुपर ४ चे तिकीट मिळणार आहे. तर पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.

आजच्या सामन्यात पाकिस्तान संघाचं विजयासाठी पारडं जड मानलं जात आहे. टी २० मध्ये दोन्ही संघांमध्ये पहिल्यांदा मुकाबला होणार आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धा अत्यंत निर्णायक टप्प्यावर आली आहे. अफगाणिस्तान, श्रीलंका, भारत या ३ संघांनी सुपर ४ मधील आपलं तिकीट कन्फॉर्म केलं आहे.

दोन्ही संघांना आपल्या सलामी सामन्यात भारतानं पराभवाची धूळ चारली आहे. दोन्ही संघाना आजच्या सामन्यात विजय संपादन करण्याची शेवटची संधी असणार आहे. विशेष म्हणजे आशिया चषक २०२२ चा हा अखेरचा साखळी सामना असणार आहे.

आजच्या सामन्यात निजाकत खान , किंचित शाह , बाबर हयात , बाबर आझम आणि मोहंमद रिझवान हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com