पाकिस्तानला झटका : Black list होण्याचा धोका कायम

इम्रानखान
इम्रानखान

इस्लामाबाद

दहशतवादाला खतपाणी घालण्यावरुन पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. टेरर फंडिंगवर नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अँक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानकडून करण्यात आलेले उपाय पुरेसे नसल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानला 'Enhanced Follow-Up यादीत ठेवले आहे. आता २१ ते २३ ऑक्टोंबर दरम्यान एफएटीएफची पँरिसमध्ये बैठक होणार आहे. यामुळे पाकिस्तान ब्लॉक लिस्टमध्ये जाण्याचा धोका आहे. मनी लॉन्ड्रिंग व टेरर फंडिंगवर संदर्भात पाकिस्तानने केलेले पर्याय पुरेसे नाहीत. पाकिस्तान यासंदर्भात FATF ने सांगितलेल्या ४० शिफारशींपैकी केवळ दोनमध्येच प्रगती केली आहे. यामुळे पाकिस्‍तान 'Enhanced Follow-Up' यादीत कायम राहणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com