Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशमुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात सहभागाची पाकिस्तानकडून प्रथमच कबुली

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात सहभागाची पाकिस्तानकडून प्रथमच कबुली

इस्लामाबाद :

मुंबईवर २६/११ ला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील ११ जण पाकिस्तानातील असल्याची खळबळजनक कबुली पाकिस्तानच्या फेडरल इनव्हेस्टींग एजन्सीने Federal Investigation Agency (FIA) ने दिली आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने हजार पेक्षा जास्त दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबईतील २६/११ हल्ल्यास मदत करणारे ११ जण पाकिस्तानमधले असून ते लष्कर ए तोयबाचे असल्याचे FIA ने पहिल्यांदाच मान्य केले आहे. या सर्व दहशतवाद्यांना मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये टाकण्यात आले आहे.

मुलतानमधील मोहम्मद अमजद खान याने या हल्ल्यासाठी बोट खरेदी केली होती. जे दहशतवादी समुद्र मार्गाने भारतात आले होते त्या सर्वांसाठी बोट खरेदी करणं. त्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करणं, त्यांच्या जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करणं अशी सगळी तयारी या 11 जणांनी केली होती.

हे आहेत आरोपी

मुंबई हल्ल्यात सहभागी असणारे पाकिस्तानातील ११ जणांमध्ये मुहम्मद अमजद खान, शाहीद गफूर, अतीक उर रेहमान, रिझ अहमद, मोहम्मद मुश्ताक, मोहम्मद नईम, अब्दुल शकूर, मोहम्मद शाबीर, मोहम्मद उस्मान, शकील अहमद, राहिम यार खान यांचा समावेश आहे.

पाकिस्तानने १२१० जणांच्या या यादीतून पाकिस्ताने मसूद अझहर, दाऊद इब्राहीम यांना वगळले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या