Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशदाऊद कराचीत: २७ वर्षात प्रथमच पाकिस्तानची कबुली

दाऊद कराचीत: २७ वर्षात प्रथमच पाकिस्तानची कबुली

नवी दिल्ली

भारतातील मोस्ट वांटेड अतिरेक्यात असणारा दाऊद इब्राहिम कराचीत राहत आहे. अखेर २७ वर्षांत प्रथमच पाकिस्तान सरकारने या गोष्टीचा स्वीकार केला.

- Advertisement -

पाकिस्तानने फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स Financial Action Task Force (FATF)च्या कारवाईपासून वाचण्यासाठी ८८ अतिरिक्यांची यादी जाहीर केली. त्यात दाऊदचे नाव आहे. दाऊद कराचीत तीन घर असल्याचे उल्लेख केला आहे.

दाऊदचे पाकिस्तानमधील पत्ते

१) व्हाइट हाउस, सऊदी मशिदीजवळ, कराची

२) हाउस नंबर 37, 30th स्ट्रीट – डिफेंस हाउसिंग अथॉरिटी, कराची

३) पलटियाल बंगलो, नूरबाद हिल एरिया, कराची

अंडरवर्ल्ड डॉन असणारा दाऊद इब्राहिमने मुंबई पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी १९९०च्या सुमारास दुबईत पळून गेला होता. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर भारतीय तपास यंत्रणांना हुलकावणी देत दाऊद इब्राहिम आणि अन्य आरोपींनी पाकिस्तानात आश्रय घेतला होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या