Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याअतिवृष्टीमुळे भातशेती सपाट

अतिवृष्टीमुळे भातशेती सपाट

हतगड । लक्ष्मण पवार Surgana / Hatgad

सुरगाणा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेती भुईसपाट झाली .

- Advertisement -

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नितिन पवार यांनी सुरगाणा तालुक्यातील विविध भागातून नुकसानग्रस्त पीकपाणीचा पहाणी दौरा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. सुरगाणा तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे भात,नागली, वरई इत्यादी पिकांचे नुकसान होऊन असंख्य शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. तालुक्यातील शेतकरी हा कोरडवाहू खरीप शेतीवर अवलंबून आहे. वर्षभरात एकच पिक घेतले जाते.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी पासून ते पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. यावेळी हाता तोंडाशी आलेला घास ह्या परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी कोलमडला असून झालेल्या संपूर्ण खर्चाची नुकसान भरपाई शासनाने देण्याची मागणी केली जात आहे. आमदार नितिन पवार यांनी तालुक्याच्या विविध भागातून पीकपाणी नुकसानीचा पहाणी दौरा सुरू केला असून शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

यावेळी आमदार पवार यांनी तालुक्यातील हट्टी,शिवपाडा, करवंदे,दूर्गापूर, तळपाडा,चिलारपाडा, वरसवाडी,वडपाडा आदी ठिकाणी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी शेतकऱ्यांना दिले असून तालुक्यातील ईतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावेळी सुरगाणा येथून जवळच असलेल्या वरसवाडी येथील पुंडलिक गावित, पोपट गावित यांच्या नुकसान झालेल्या

भातशेतीची पहाणी करतांना आमदार नितिन पवार.समवेत तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे,युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू पवार,रमेश थोरात, चंदर वाघमारे आदींसह नुकसानग्रस्त शेतकरी.उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या