Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालय आज पदयात्रा

ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालय आज पदयात्रा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

देशभर स्वातंत्र्याची आणि संविधानाची पायमल्ली होत आहे. याचा निषेध म्हणून सर्व राजकीय पक्ष आणि जनसंघटनांचा एकजुटीचा आवाज मुंबईत घुमणार आहे. आज, २ ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळा या मार्गावर ‘नफरत छोडो, भारत जोडो’ (Nafrat chodo, Bhart Jodo ) या यात्रेमार्फत एक नवी मोहीम सुरू होत आहेत.

- Advertisement -

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप तसेच महात्मा गांधी फाऊंडेशनचे निमंत्रक तुषार गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ‘नफरत छोडो, भारत जोडो’ या यात्रेसंदर्भात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.

संविधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी, विद्वेष आणि जनविरोधी नीतीच्या विरोधात आम्ही एक होत आहोत. महात्मा गांधींच्या १५३व्या जयंतीनिमित्त प्रेम आणि सहिष्णुतेचा संदेश पसरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सोबत चालण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव, नरेंद्र राणे, समाजवादी पक्षाचे मेराज सिद्दिकी, माजी नगरसेवक फहाद आझमी, कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, सीपीएमचे डॉ एस. के.रेगे, शैलेंद्र कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे डॉ. राजेंद्र गवई, शेकापच्या साम्या कोरडे याशिवाय लालनिशाण, भारत बचाव आंदोलन, सेव्ह आरे आंदोलन, दलित पॅंथर, पाणी हक्क समिती तसेच इतर संस्था आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या