Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक ऑक्सिजन लिकेज : २२ जणांचा मृत्यू, संख्येत वाढ होण्याची भीती

नाशिक ऑक्सिजन लिकेज : २२ जणांचा मृत्यू, संख्येत वाढ होण्याची भीती

नाशिक

राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाली. या घटनेमुळे ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाला. या घटनेत २२ जण दगावल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. ही संख्या वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

नाशिक ऑक्सिजन लिकेज : माझी आई तडफडून, तडफडून मेली

“ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याविषयी महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल. यासंदर्भात सरकारला देखील माहिती कळवण्यात आली आहे,” अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

झाकीर हुसेन रुग्णालयात १५० रुग्ण होते. त्यातील २३ जण व्हेटीलेंटवर आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. या घटनेमुळे ३०-३५ जणांचा प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात वर्ग केले जात आहे. चिंताजनक असलेल्या त्वरित उपचार केले जात असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

रुग्णालयात पोलिस बंदोबस्त

रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी बंदोबस्त लावण्यात आल्याचे आयुक्त पांडे यांनी सांगितले.

मंत्री राजेंद्र शिंगणे

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही. राज्यात अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

दीड तासांनी गळती रोखण्यास यश

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले होते. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न केला. जवळपास एक दीड तासाने ही ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले.

प्रविण दरेकर म्हणाले…

प्रविण दरेकर यांनी टि्वट करत सांगितले की, निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले

- Advertisment -

ताज्या बातम्या