नाशिकमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा : नगर, औरंगबादहून येणार पुरवठा

औषध कंपन्या वगळता उद्योगाचे ऑक्सिजन बंद
नाशिकमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा : नगर, औरंगबादहून येणार पुरवठा

नाशिक

एकीकडे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीने २४ निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागल्याची घटना नाशिकमध्ये ताजी असतानाच शहरातील काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत नगर, औरंगबादहून नाशिकमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच औषध कंपन्या वगळता उद्योगाचे ऑक्सिजन बंद करण्यात आले आहे.

बैठकीनंतर जिल्हाधिकारींनी सांगितले की, आज नाशिक शहरातील काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही अडचण दूर करण्याची ऑक्सिजन वितरकांना सूचना देण्यात आली आहे. तसेच नगर व औरंगबाद येथील ऑक्सिजन पुरवठादरांशी बोलणी झाली आहे. त्यांच्यांकडून पुरवठा येणार आहे. औषध कंपन्या वगळता इतर सर्व उद्योगाचे ऑक्सिजन बंद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांची संख्या 7 हजार इतकी आहे. कमी अधिक प्रमाणात रुग्ण अनेक रुग्णालयात उपचार घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार अनेक रुग्णालयात 130 लिटर प्रति मिनिट असा वापर रुग्णालयांत होत आहे. त्यामुळे या रुग्णालयांनी ऑक्सिजनचा कमी प्रमाणात वापर करावा. गळती दुरुस्ती करून ऑक्सिजनचा वापर कमी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आज काही हॉस्पिटलच्या बाबतीत तुटवडा निर्माण झाला असून आजची अडचण दूर करण्याची ऑक्सिजन वितरकांना सूचना केली असून दुपारपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन टंचाईवर सगळ्यांनी मिळून मात करायला हवी. ऑक्सिजचा वापर फक्त फार्मासिटीकल कंपन्यांनी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com