आरोग्यमंत्री म्हणाले, नाशिकमधील ऑक्सिजन लिकेज किरकोळ : त्वरित थांबवला

आरोग्यमंत्री म्हणाले,  नाशिकमधील ऑक्सिजन लिकेज किरकोळ : त्वरित थांबवला
राजेश टोपेRajesh Tope

नाशिक

राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती होत आहे. ती आता थांबवण्यात आली.

Title Name
Video : ऑक्सिजन टाकीत भरत असताना झाला लिक
राजेश टोपे

यासंदर्भात माध्यमांशी बोलतांना आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे म्हणाले, “नाशिकमध्ये ऑक्सिजनचा लिकेज झाला. हा किरकोळ लिकेज होता. त्यामुळे ऑक्सिजन वाया गेला नाही. लिकेज लक्षात येताच त्वरित थांबण्यात आला. यासंदर्भात मी स्वत: जिल्हाधिकरांशी संवाद साधून माहिती घेतली. तंत्रज्ञाचा वापर करुन हा लिकेज त्वरित थांबवण्यात आला. यामुळे मोठा अनर्थ टळला.

नाशकातील डॉ झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये आज ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. यावेळी या टाकीत ऑक्सिजन भरत असताना अचानक ऑक्सिजन लिक झाल्याने सर्वत्र रस्त्यावर पसरला.

Title Name
सीरम राज्य सरकारला ४०० रुपयांत तर खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयात देणार लस
राजेश टोपे
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com