ऑक्सिजन गळती दुर्घटना : चौकशी समिती अध्यक्षपदी झगडे यांची नियुक्ती करा

ऑक्सिजन गळती दुर्घटना : चौकशी समिती अध्यक्षपदी  झगडे यांची नियुक्ती करा

नाशिक । प्रतिनिधी

डॉ झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांची नेमणूक करा, अशी मागणी जागरुक नाशिककर संघटनेने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीची चौकशी समिती महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमावी अशी मागणी शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भाजप आदींनी केली आहे. पालकमंत्री भुजबळ यांनी दखल घेऊन नाशिककराना सत्य बाहेर येण्यासाठी पारदर्शक निर्णय घ्यावा अशी भावना नाशिकमधील नागरिकांची आहे.

करोना काळात आंदोलनाची वेळ आल्यास करोना नियम, संचारबंदीचे नियम पाळून पालकमंत्री समोर आंदोलन जागरूक नाशिककर करतील. ऑक्सिजन गळतीमुळे 29 पेक्षा अधिक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीत माजी मनपा आयुक्त व तत्कालीन महसूल आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

समितीत सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत व सर्व स्थानिक आहेत. आम्ही आपणास विनंती करतो की सदर समितीचे अध्यक्ष यांनीच मनपा नाशिक आयुक्त असतांना बरेच करोना विरुद्ध लढ्यासंदर्भात निर्णय घेतले आहेत. त्यामुळे निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी अनुभवी माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांचा अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून समितीत माजी न्यायमूर्ती व पोलीस अधिकारीचा समावेश करून समितीची पुनर्गठन करून निःपक्षपाती चौकशी करून मृतांना न्याय द्यावा. अन्यथा ठेकेदारवर खापर फोडून मोकळे होतील.

करोना योध्ये म्हणून कार्यरत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी दहशतीत , दबावात, पुरेसे करोना संरक्षण साहित्य नसतांना सेवा करीत आहेत. महाराष्ट्रातील इतर मनपा करोना काळात मानधनावर कार्यरत असणार्‍यांना प्रोत्साहन भत्ता, दिवाळी बोनस देत आहेत. मात्र नाशिक मनपाने नाकारले आहे. याचीही चौकशी करण्यात यावी.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com