एमआयडीसी मधील ऑक्सिजन लोप पावतोय

एमआयडीसी मधील ऑक्सिजन लोप पावतोय

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad Industrial Estate) असलेल्या एमआयडीसीच्या (MIDC) जागेवर करण्यात आलेल्या वृक्षारोपणानंतर (tree plantation) आता तेथील झाडांची अवस्था

अतिशय दयनीय झाली असून एमआयडीसी प्रशासनाने (MIDC Administration) त्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये (Ambad Industrial Estate) वृक्षतोडीच्या आत्तापर्यन्त बऱ्याच घटना घडल्या आहेत मात्र हि वृक्ष तोड करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाला अपयश आले आहे. बऱ्याच ठिकाणी तर एमआयडीसी प्रशासनाने वृक्षारोपणासाठी आरक्षित केलेल्या जागांचे प्लॉट तयार करून विक्री देखील झाल्याचे काही उद्योजकांनी सांगितले.

एमआयडीसी प्रशासनातर्फे ठेका देऊन वृक्षारोपण (tree plantation) करण्यात आले होते मात्र दोन वर्षांचा ठेका संपल्यानंतर याठिकाणी वाढ झालेल्या झाडांकडे लक्ष देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत असलेली कोका कोला कंपनीकडे त्यासमोरील मोकळा भूखंड वृक्षारोपणासाठी एमआयडीसी प्रशासनातर्फे देण्यात आला होता.

मात्र सदरहू कंपनी बंद झाल्यानंतर याठिकाणी तब्बल ५० ते ६० फूट वाढ झालेल्या झाडांकडे कुणीही लक्ष न दिल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वुक्षतोड करण्यात आल्याने हिरव्यागार जंगलाला आता बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. वास्तविक पाहता एमआयडीसी प्रशासनाने याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात (police station) गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते मात्र एमआयडीसी प्रशासनाने त्याची तसदी घेतली नाही व येथील प्रश्न आहेच तसाच सोडून दिल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जातो.

औद्योगिक वसाहतीत झाडे लावण्याचा नियम असतांना प्रत्यक्षात झाडे लावली जातात मात्र त्याची संगोपनाची जबाबदारी प्रशासनातर्फे घेतली जात नसल्याची मोठी शोकांतिका नाशकात बघायला मिळत आहे. नाशिक मध्ये पर्यावरण संस्था, निमा (NIMA), आयामा (AIMA) सारख्या संघटना आहेत ज्या विविध उपक्रम सातत्याने राबवित असतात.

एमआयडीसी प्रशासनाने जर सदर संघटनांकडे जाऊन वृक्षारोपणासारखा व त्यांचे संगोपन करण्याचा प्रस्ताव मांडला तर सदर संस्था देखील हा प्रस्ताव आनंदाने स्वीकारून वृक्षरोपणासह त्यांचे संगोपन करण्यास पुढाकार घेतील व अंबड औद्योगिक वसाहत (Ambad Industrial Estate) पुन्हा सुजलाम सुफलाम होऊन सर्वत्र हिरवळ दरवळेल यात शंकाच नाही.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com