राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली: ७०० मेट्रिक टन झाल्यास निर्बंध कठोर

राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली:  ७०० मेट्रिक टन झाल्यास निर्बंध कठोर
File Photo

राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा (oxygen)वापर हळूहळू वाढतो आहे. आता हा वापर दररोज सुमारे ४०० मेट्रिक टन इतका वाढला आहे, दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध (restaction)लावावे लागू शकतील हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे तसेच इतर नियोजन तयार ठेवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांनी सांगितले.

File Photo
बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

मुंबई व इतर प्रमुख शहरांशिवाय आता हळूहळू राज्याच्या ग्रामीण भागात संसर्ग वाढत आहे. रुग्णालयात दाखल ज्या रुग्णांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज भासत नाही असे दिसते. युके, अमेरिका या देशांतही आता रुग्णालयांमध्ये संख्या वाढून व्यवस्थेवर ताण यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बेसावध राहू नका असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्णवाढ झपाट्याने होतच असून जानेवारीत शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीत पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली.

Related Stories

No stories found.