Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याबँक कर्मचाऱ्यानेच लुबाडले शेतकऱ्यांचे दीड कोटी; महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेतील प्रकार

बँक कर्मचाऱ्यानेच लुबाडले शेतकऱ्यांचे दीड कोटी; महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेतील प्रकार

भऊर | वार्ताहर Bhaur

देवळा तालुक्यातील भऊर (Bhaur Tal Deola) येथील महाराष्ट्र बँकेत रोजंदारीवर कार्यरत असतांना पदाचा गैरफायदा घेऊन सुमारे १ कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे….(one crore fifty lakh thirty seven lakh four hundred fifty rupees cheating by bank worker in bhaur area)

- Advertisement -

संशयित भगवान ज्ञानदेव आहेर (रा. लोहोणेर ता देवळा ) याच्या विरोधात भादवी कलम ४२०,४६७,४६८,४०६,४०८,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर आरोपी फरार असून देवळा पोलीस (Deola Police Station) त्याचा शोध घेत आहेत.

त्याला तात्काळ अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक दिलीप लांडगे यांनी दिली. या घटनेबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत भगवान ज्ञानदेव आहेर (रा लोहोणेर ता देवळा ) हा सण २०१६ पासून ते ८/७/२०२२ पर्यंत रोजंदारीवर कार्यरत होता.

त्याने त्याच्या पदाचा गैरफायदा घेऊन ठेवीदार, खातेदार यांचा विश्वास संपादन करून बँकेतील जवळपास ३२ खातेधारकांच्या खात्यावरील पीक कर्जाची रक्कम घेऊन बँकेच्या सही शिक्का असलेल्या स्वतः हस्तलिखित पेनाने लिहिलेल्या मुदत ठेवीच्या पावत्या बनावट तयार करून त्या बँके ठेवीदारांना त्त्यांचेकडील रक्कम स्वीकारून अदा केल्या.

व ही रक्कम बँकेत जमा न करता लुबाडली. १ कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रुपये एवढी रक्कम असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मालेगाव येथील बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्रीराम भोर यांनी देवळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

त्यानुसार संशयिताच्या विरोधात अफ़रातफ़रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबधीत आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही आर देवरे आदी करीत आहेत.

सहकारी बँक, पतसंस्थेत आर्थिक घोळ झाल्याचे व पैसे बुडाल्याचे चित्र नागरिकांनी बघितले आहे. मात्र, राष्टियकृत बँकेत अशा प्रकारे अपहार होत असेल तर नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवावा. ग्रामीण भागात शेतकरी काबाड कष्ट करून, पोटाला चिमटी देत आपली पुंजी बँकेत ठेवतात. त्यालाही सुरक्षितता नाही. अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत. भऊर येथील महाराष्ट्र बँकेतुन अपहार झालेली रक्कम संबंधित खातेदारांना तात्काळ मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष पंडितराव निकम यांनी केली आहे.

मी फिक्स डिपॉझिट करण्यासाठी चार लाखाचा चेक बँकेत संबंधित कर्मचारी भगवान याच्याकडे दिला होता. माझ्या बँक खात्यातून त्याच दिवशी चेक पास झाला. भगवान याने मला फिक्स डिपॉझिट केल्याची पावती देखील लिहून दिली आहे. मात्र, बँकेत चेक केले असता, बँकेत माझे फिक्स डिपॉझिट आढळून आले नसल्याने माझी चार लाखांची फसवणूक झाली आहे.

सविता रवींद्र शिंदे, वरवंडी – बँक खातेदार

- Advertisment -

ताज्या बातम्या