'या' सोयीमुळे वाचले अनेकांचे प्राण
सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून चारशे रुग्णांना डिस्चार्ज
मुख्य बातम्या

'या' सोयीमुळे वाचले अनेकांचे प्राण सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून चारशे रुग्णांना डिस्चार्ज

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

सिन्नर तालुक्यातील अनेक भागात करोनाचा शिरकाव झाला असला तरी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाने केलेले योग्य नियोजन आणि तत्काळ उपचारांमुळे आतापर्यंत ३९८ रुग्ण करोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तसेच सेंट्रल ऑक्सिजन लाईनमुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात येथील आरोग्य विभागाला यश आले आहे. त्यांच्या कामकाजाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी या सर्व टीमचा गौरव केला.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे सिन्नर ग्रामीण रुग्णालयाला यश मिळाल्याचे कार्यरत असलेल्या पथकाने सांगितले.

सिन्नर येथील कोविड सेंटरमधून आज २९ जुलै रोजी यशस्वी उपचारानंतर १९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.निर्मला गायकवाड यांनी दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ.संजय वळवे, रुग्णालयातील सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उपचार पध्दती

करोनावर अनेक उपाय आणि आयुर्वेदिक पद्धतीबाबत सध्या चर्चा सुरू आहे. मात्र सिन्नर येथील ग्रामीण रुग्नालयातील वैद्यकीय पथकाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीचाच अवलंब केला.

रुग्णांसाठी चांगल्या दर्जाची आहार व्यवस्था

सिन्नर येथे रुग्णांसाठी ६० खाटांची व्यवस्था असलेली अद्यावत नवीन इमारत असून त्यात रुग्णांसाठी उत्कृष्ट स्वच्छतेची व्यवस्था, जैव वैद्यकिय कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले. रुग्णांसाठी प्रथिनांनी युक्त्त चांगल्या दर्जाची आहार व्यवस्था त्यामध्ये दूध, अंडी, गरम पाणी आणि काढा देण्यात आला.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com