Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यादारणा धरणातून १५ हजार क्यूसेसपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग

दारणा धरणातून १५ हजार क्यूसेसपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग

नाशिक । Nashik

पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात (Igatpuri taluka) गेल्या दोन दिवसांपासून पावसाची (rain) संततधार सुरु असल्याने दारणा धरणाच्या (Darna Dam) पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे या धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे…

- Advertisement -

या मुसळधार पावसामुळे दारणा धरणाच्या पाणी पातळीत (Water level Increase) मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने दारणा धरणातून १५ हजार ८० क्यूसेस इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच सध्या दारणा धरणात ४ हजार ८०५ दशलक्ष घनफुट इतका पाणीसाठा असून धरण ६९ टक्के भरले असल्याची माहिती दारणा धरणाचे शाखा अभियंता एस. एम. जाचक यांनी दिली आहे.

तसेच दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या या पावसामुळे इगतपुरीत १३२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील वाडीवऱ्हेमध्ये (Wadiwarhe) १०५, घोटी बुद्रुक (Ghoti Budruk) ११९ नांदगाव बुद्रुक (Nandgaon Budruk) ६४ धारगाव (Dhargaon) १०२ इतक्या मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून इगतपुरी तालुक्यात एकूण १७९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पावसाच्या या संततधारेमुळे इगतपुरी तालुक्यातील भात शेतीचेही (Rice farming) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरातील नदी, नाले पुन्हा दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तसेच हा पाऊस असाच सुरु राहिला तर भात लागवडीची कामेही रखडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या