Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअबब! नाशिक विभागात ८५ हजार करोना 'पॉझिटिव्ह'

अबब! नाशिक विभागात ८५ हजार करोना ‘पॉझिटिव्ह’

नाशिक । प्रतिनिधी

वातावरणात होणार बदल व त्याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने कोरोनाची रुग्णसंख्या वाढतांना दिसते आहे. परंतु अशाही परिस्थितीत आरोग्य विभाग व प्रशासनाचे योग्य नियोजन यामुळे रुग्णबरे होण्याचे प्रमाण देखील…

- Advertisement -

दिसून येत असून नाशिक विभागात आजपर्यंत 85 हजार 278 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पैकी 65 हजार 626 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 17 हजार 514 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागातील मृत्युदर 2.50 टक्के तर बरे होण्याचा दर 76.95 टक्के असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिली आहे.

विभागात जरी रूग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 76.96 टक्के असून मृत्युदर 2.50 टक्के इतका आहे. तसेच उपचार घेणार्‍या रुग्णांना बरे करण्यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचे डॉ. पट्टणशेट्टी यांनी सांगीतले.

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 33 हजार 88 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 26 हजार 596 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 24 हजार 387 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 17 हजार 105 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 6 हजार 517 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 7 हजार 670 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 5 हजार 757 रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 18 हजार 927 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 15 हजार 636 रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. आजपर्यंत 268 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 2 हजार 45 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून नंदुरबार हा सर्वाधिक कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्हा आहे. तसेच 1 हजार 79 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या