दिलासादायक : उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये जवळपास पाचशे रुग्णांची घट

जिल्ह्यात आजपर्यंत ८१ हजार ६१ रुग्ण करोनामुक्त; सद्यस्थितीत 'इतके' रुग्ण घेतायेत उपचार
करोना
करोना

नाशिक | Nashik Corona Update

जिल्ह्यातील ८१ हजार ०६१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ६ हजार ६५६ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ४९१ ने घट झाली आहे....

आत्तापर्यंत १ हजार ६०१ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक तालुका ३६८ तर चांदवड तालुक्यात १६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वाधित रुग्ण सिन्नर तालुक्यात असून सद्यस्थितीत ७६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दिंडोरी तालुक्यात २८९, निफाड तालुक्यात ४८३, देवळा तालुक्यात ४५, नांदगांव २७५, येवला ११४, त्र्यंबकेश्वर १२३, सुरगाणा १६, पेठ २०, कळवण १०९, बागलाण २०७, इगतपुरी १३९, मालेगांव ग्रामीण १६२ असे एकूण ३ हजार २७८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ४०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २०१ तर जिल्ह्याबाहेरील १३७ असे एकूण ६ हजार ६५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ८९ हजार ३१८ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत नाशिक ग्रामीण मधे ८४.८१, टक्के, नाशिक शहरात ९३.४६ टक्के, मालेगाव मध्ये ९०.९९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७४.१४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९०.७६ इतके आहे.

नाशिक ग्रामीण ५६५, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६३ व जिल्हा बाहेरील ३६ अशा एकूण १ हजार ६०१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

जिल्ह्यातील ८९ हजार ३१८ करोनाबाधित रुग्णांपैकी ८१ हजार ०६१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सध्या जिल्ह्यात ६ हजार ६५६ पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील आणि जिल्ह्यातील विविध रूग्णालयांत उपचार सुरु आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com