नाशकात आजपासून दिला जातोय 'प्रिकॉशन डोस'; 'इतके' हजार हेल्थ वर्कर्स पात्र

नाशकात आजपासून दिला जातोय 'प्रिकॉशन डोस'; 'इतके' हजार हेल्थ वर्कर्स पात्र

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health Workers) आजपासून प्रिकॉशन डोस (Precaution Dose) दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जवळपास 45 हजार हेल्थ वर्कर्सला हा डोस डोस दिला जाईल....

या डोससाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate) दाखवण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये एकच अट सांगण्यात आली आहे. ती म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये नऊ महिन्यांचे अंतर बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. (Nine month distance in second and third dose)

10 एप्रिल 2021 पू्र्वी डोस घेतलेले एकूण 45 हजार हेल्थ वर्कर्स या मोहिमेसाठी पात्र असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी यासाठी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणालाही गती देण्यात येणार असून लवकरच ज्येष्ठ नागरिकांच्या बुस्टर डोसलाही परवानगी दिली जाणार आहे.

नाशिकमध्ये दिवसाला एक हजार रुग्ण सध्या आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन कंबर कसून कामाला लागले आहे. दोन डोस घेतलेल्या व्यक्ती आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये ९ महिने पूर्ण केलेल्या व्यक्तींना बुस्टर डोस दिला जाणार आहे. यासाठी ८ जानेवारीपासून नोंदणी सुरु झाली असून आजपासून हे लसीकरण सुरु केले जाणार आहे.

पोलीस अधीक्षकांनी घेतला तिसरा डोस

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज सकाळी तिसरा डोस घेतला. डोस घेतल्यानंतर त्यांनी फोटो शेअर करत तिसरा डोस घेण्याचे आवाहन केले.

Related Stories

No stories found.