नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र पाेलीस अकादमी(एमपीए) मध्ये कराेनाने शिरकाव केला आहे. नव्या पाेलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या त्र्यंबक राेडवरील एमपीएत 167 प्रशिक्षणार्थी अधिकारी व इतर कर्मचारी कराेनाबाधित आढळले आहेत...

यामध्ये प्रशिक्षणार्थी पाेलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. कराेनाबाधित प्रशिक्षणार्थींना ठक्कर डाेम तसेच शहरातील इतर ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यामुळे पाेलीस प्रशासनासह जिल्हा यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.

पोलीस अकादमीतील एकूण ८९४ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १६७ बाधित आढळून आले आहेत. यामध्ये ठक्कर डोम येथे १२१ प्रशिक्षणार्थी दाखल आहेत. तर इतर बाधित ४८ प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी मेडिकल कॉलेज आणि खासगी रुग्णालयात दाखल आहेत.

प्रशिक्षणार्थी अधिकारी फीट आहेत. त्यांची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली आहे परंतु हे प्रशिक्षणार्थी मुले कसे बाधित आढळले याबाबत आश्चर्य वाटत असल्याचे डॉ राजेंद्र भंडारी म्हणाले.

पोलीस अकादमी परिसरात मोठी-मोठी वृक्ष आहेत. याठिकाणी थंडी जास्त आहे; कदाचित या कारणाने या प्रशिक्षणार्थी मुलांना बाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकमधील परिस्थिती नियंत्रणात असताना अचानक प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना जे अधिकारी अकादमीतून बाहेर पडू शकत नव्हते. तरीदेखील ते बाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.