करोनामुक्त
करोनामुक्त
मुख्य बातम्या

नाशकात आतापर्यंत १४ हजार ८६४ रुग्ण 'करोनामुक्त'

सद्यस्थितीत ४ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | Nashik

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील १४ हजार ८६४ करोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत ४ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ५९७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक २९६, चांदवड ३९, सिन्नर २१४, दिंडोरी ६९, निफाड १८७, देवळा ७६, नांदगांव ७७, येवला ०६, त्र्यंबकेश्वर ०५, सुरगाणा १२, पेठ ००, कळवण ०३, बागलाण ५७, इगतपुरी ४८, मालेगांव ग्रामीण ८८ असे एकूण ११७७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ०३४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २९१ तर जिल्ह्याबाहेरील ११ असे एकूण ४ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १९ हजार ९७४ रुग्ण आढळून आले आहेत.

यासोबतच जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७२.१४, टक्के, नाशिक शहरात ७४.९७ टक्के, मालेगाव मध्ये ७५.६४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.३२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.४२ इतके आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत १५० मृत्यू झाले आहेत तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८९ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ५९७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

विशेष म्हणजे १९ हजार ९७४ करोनाबाधित रुग्णांपैकी १४ हजार ८६४ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे.

सध्या जिल्ह्यात ४ हजार ५१३ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.४२ टक्के एवढ्यावर आले आहे. नाशिककरांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com