Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यायंदाची नाही, पण पुढची दिवाळी हक्काच्या घरात साजरी करू

यंदाची नाही, पण पुढची दिवाळी हक्काच्या घरात साजरी करू

मनमाड | प्रतिनिधी

प्रत्येकाचे स्वप्न असते की, त्याचे स्वत:चे घर असावे. नांदगाव तालुक्यातील झोपडीत राहणारे हजारो गोरगरीब गरजू यांचे हे स्वप्न शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या अथक प्रयत्नामुळे पूर्ण होणार असून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तालुक्यातील 83 गावातील तब्बल 1 हजार 219 लाभार्थी साठी घरकुल मंजूर झाले आहेत.

- Advertisement -

आमदार कांदे यांनी सतत पाठपुरावा करून घरकुल योजना मंजूर करून आणली. नांदगाव तालुक्यात एकाच वेळी इतकी घरकुल मंजूर होण्याची ही पहिली घटना आहे. लवकरच घरकुलांच्या कामाला सुरुवात होणार असल्यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करून आमची पुढील दिवाळी स्वत:च्या आणि हक्काच्या घरात साजरी करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

नांदगाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात गोरगरीब मजुरांची संख्या मोठी असून वाड्या-वस्त्यासह गावातील अनेक नागरिक हे आज ही झोपड्यात राहतात. त्यांच्याकडे पक्की घरे नसल्यामुळे उन्हाळा,पावसाळा असो किंवा हिवाळा या गोर गरिबांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

अशा गोर-गरिबासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली असून राज्य शासनाच्या मदतीने ही योजना राबवली जाते.आमदार सुहास कांदे यांनी घरकुल योजनेची माहिती घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या मतदार संघातील अनेक गोरगरीब या योजने पासून वंचित आहे.

त्यामुळे त्यांनी लाभार्थीची यादी तयार करून ती शासन दरबारी दखलच केली नाही तर सतत पाठपुरावा देखील केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने नांदगाव तालुक्यातील ज्या गावासाठी घरकुल योजना मंजूर केली.

त्यात आमोदे, अनकाडे, अस्तगाव, बाभुळगडी, बाभूळवाडी, बाणगाव बु, बाणगाव खुर्द, बेजगाव, भालूर, भारडी, भौरी बोयेगांव, बिरोळे, चांदोरा, चिंचविहीर, दहेगांव, दर्हेल, धनेर, ढेकू, घोटाणे बु, घोटाणे कुर्द, एकवाई, फुलेनगर, गंगाधरी, गोंडेगांव, हिंगणवाडी, हिंगणे, देहरे, हिसवळ बु, हिसवळ खुर्द, जळगाव खुर्द, जळगाव बु, जामदरी, जातेगाव, जवळकी, कळमदारी, कार्ही, कसाबखेडा, कासरी, खांदगांच, खिर्डी, कोंढार क्रांतीनगर, कुसुमतेल, लक्ष्मीनगर, लोढरे, लोहशिंगवे, माळेगाव कर्यात, मल्हारवाडी, मांडवड, मंगळणे, माणिकपुंज, मोहेगाव, मोरझर, मूळडोंगरी, नागापुर, नांदुर, नवे पांझण, नवसारी, न्यायडोंगरी, पळाशी, पानेवाडी, परधाडी, पिंप्रीहवेली पोखरी, रणखेडा, रोहिले बु., साकोरा, शास्रीनगर, श्रीरामनगर, सोयेगांव, टाकळी, टाकळी खु., तळवाडे, तांदुळवाडी, बेहेळगांव, वडाळी बु., वडाळी खुर्द, वाखारी, वंजारवाडी यासह इतर गावांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या