Wednesday, May 8, 2024
Homeजळगावअरेच्च्या... वर्गात लागणार शिक्षकांचे फोटो ?

अरेच्च्या… वर्गात लागणार शिक्षकांचे फोटो ?

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आपले गुरुजी मोहिमेंतर्गत (Under your Guruji campaign) शाळांच्या (class) प्रत्येक वर्गात शिक्षकांचा फोटो (Teacher’s photo) लावण्याचे आदेश (order) शासनाने (government) जि.प.शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहे. दरम्यान, वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करावा (decision should be annulled), अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीने (Bharathi, Maharashtra State Primary Teacher) मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या निर्णयाविरोधात दि.29 ऑगस्ट रोजी सर्व शिक्षक काळ्या फिती लावून काम (Wearing black ribbons) करणार आहे.

- Advertisement -

मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनुसार शिक्षण आयुक्त पुणे यांनी 24 ऑगस्ट रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना विसीद्वारे ए फॉर साईज पेपरवर शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान आ. प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. या दोन्ही घटना समाज व्यवस्थेतील शिक्षकांच्या सन्मानाला धक्का देणार्‍या आहेत. शासन पातळीवर जाणीवपूर्वक शिक्षकांना बदनाम करून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेचा शिक्षक भारतीने तीव्र निषेध केला आहे.

दि. 27 ऑगस्ट रोजी शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हाध्यक्ष यांनी उपरोक्त मुद्याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्याध्यक्ष अशोक बेलसरे आणि प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी सभेत कृती कार्यक्रम ठरविला आहे.

वर्गात फोटो लावण्याचा निर्णय रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात दि.29 ऑगस्ट रोजी शासन निर्णयाचा निषेध करण्यासाठी शाळेत काळ्या फिती लावून काम करावे. तसेच आपल्याला पाठवलेले निवेदन सर्व शिक्षणाधिकारी यांना पदाधिकारी यांच्या उपस्थित देण्यात यावे, असा ठराव करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या