Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात पहिल्या ई-लोकअदालतीचे आयोजन

जिल्ह्यात पहिल्या ई-लोकअदालतीचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात येत्या 1 ऑगस्टला पहिल्या ई -लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या( Maharashtra State Legal Services Authority ) आदेशाने ही ई लोकअदालत ( t E-Lok Adalat ) होणार आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याने तो टाळण्यासाठी ई लोकअदालतीचे आयोजन नाशिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ( Courts ) करण्यात आले आहे.

- Advertisement -

यामध्ये ई लोक अदालतीत दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी, मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद, भूसंपादन, धनादेश न वटणे, बँक, वित्तीय संस्था यांची व इतर न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे व बँक, वित्तिय संस्था, शासकीय आस्थापना यांच्या थकीत रक्कम वसुलीची दाखलपूर्व प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत.

पक्षकारांनी करोना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करून या ई लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी केले आहे.

वादाला पूर्णविराम

लोकअदालतीत मिटलेल्या प्रकरणांना अपिल नसल्याने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वादाला पूर्णविराम मिळतो. तसेच वाद तडजोडीने मिटल्यामुळे दोन्ही पक्षांचा विजय होतो. प्रकरणाचा त्वरीत निपटारा होतो, निकाली निघणार्‍या प्रकरणांमध्ये कायदयानुसार कोर्ट फी परत मिळते.

लोकन्यायालयामध्ये प्रकरण तडजोड झाल्यास वादास कायम स्वरूपी पूर्णविराम मिळून वेळ व पैशांची बचत होते, त्यामुळे या ई लोकअदालतीचा लाभ पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश वाघवसे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या