Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यस्तरीय मराठी भाषा चिंतन शिबिराचे आयोजन

राज्यस्तरीय मराठी भाषा चिंतन शिबिराचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मराठी भाषा शिक्षकांसाठी For secondary and higher secondary Marathi language teachers राज्यस्तरीय मराठी भाषा चिंतन शिबिर Marathi Language Contemplation camp सातारा Satara येथे होणार आहे. दि.25-26 डिसेंबरला होणार्‍या या शिबिराचे आयोजन मायमराठी राज्य अध्यापक संघाने केले आहे.

- Advertisement -

सातार्‍यातील पुणे-बंगलोर महामार्गावरील वाढे फाट्यावर यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या टेक्निकल कँम्पसमध्ये नाशिकचे प्रसिध्द कवी प्राचार्य लक्ष्मण महाडिक Famous Poet & Principal Laxman Mahadik, Nashik यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर होत आहे.

25 डिसेंबरला सकाळी 11 वाजता सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, पुणे येथील अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे शिबिराचे स्वागताध्यक्ष आहेत.

उद्घाटनानंतर दुपारी 2 ते 3 दरम्यान पहिल्या सत्रात निवृत्त शिक्षण उपसंचालक व सुप्रसिध्द कथाकथनकार मकरंद गोधळी ‘वाचिक अभिनय तंत्र आणि मंत्र’ या विषयावर विचार मांडतील. ‘मराठी भाषा सक्तीचा अधिनियम सद्यस्थिती’ या विषयावर प्रा. अनिल पाटील मनोगत व्यक्त करतील. दुसर्‍या सत्रात दुपारी 3 ते 4 दरम्यान ’पसायदान’ या विषयावर प्रसिध्द प्रबोधनकार इंद्रजीत देशमुख संवाद साधतील. तिसर्‍या सत्रात सायंकाळी 5 ते 7 या वेळेत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रा. प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन होईल .त्यात कवी प्रा. वैजनाथ महाजन, कवी वसंत पाटील, कवयित्री मनिषा पाटील व इतर कवी सहभागी होतील.

रविवारी, 26 डिसेंबरला सकाळी 9.30 ते 11.30 या पहिल्या सत्रात पुण्याचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख व अंभेरी शिवधामचे आचार्य शिवानंद भारती यांची प्रकट मुलाखत प्रा. अनिल बोधे व डॉ.प्रिया निघोजकर घेतील. सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 दरम्यान दुसर्‍या सत्रात ‘नवे शैक्षणिक धोरण 2020’ या विषयावर प्रा. डॉ. सुफिया शिकलगार विचार मांडतील. दुपारी 12.30 ते 1.30 या तिसर्‍या सत्रात ‘मायमराठी राज्य अध्यापक संघाची भविष्यातील वाटचाल ’या विषावर विश्वस्त हनुमंत कुबडे विचार मांडतील.

दुपारी 2.30 ते 3.30 दरम्यान चौथ्या सत्रात ‘मराठी भाषा साहित्य एक सांस्कृतिक अनुबंध’ या विषयावर प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे विचार मांडतील. शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा समारोप होईल. मराठी भाषा शिक्षकांनी शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन हनुमंत कुबडे, लक्ष्मण महाडिक, व्दारकानाथ जोशी, अनिल बोधे, रमाकांत देशपांडे, अशोक तकटे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या