Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात आंतरराष्ट्रीय हिमॅटॉलॉजी परिषदेचे आयोजन

नाशकात आंतरराष्ट्रीय हिमॅटॉलॉजी परिषदेचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आयएमए नाशिक ( IMA Nashik ) आणि भारतीय हिमॅटॉलॉजी ट्रांस्फ्युजन सोसायटी(Indian Society of Hematology Transfusion)यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.20)आणि उद्या (दि.21) आंतरराष्ट्रीय हिमॅटॉलॉजी परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयएमए नाशिकच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील व सचिव डॉ. विशाल पवार यांनी दिली. परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ हजेरी लावणार असल्याची माहिती हिमॅटोलॉजीस्ट डॉ. सिद्धेश कलंत्री यांनी दिली.

- Advertisement -

रक्तविकार, प्लेटलेटस कमी होणे, रक्तगोठण्यांच्या प्रक्रियेत अडथळा होणे, गरोदरपणातील रक्ताच्या संदर्भातील विकार, लोहाची कमतरता, रक्त संक्रमणाच्या विवीध रिअ‍ॅक्शन्स् अशा विविध विषयांवर माहीती दिली जाणार आहे. परिषदेसाठी राष्ट्रीय सचिव डॉ. मैत्रेयी भट्टाचार्य यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच परिषदेसाठी वक्ते म्हणून सुप्रसिद्ध हिमॅटोलॉजीस्ट डॉ.उदय यनमंद्रा, डॉ. उत्तमकुमार नाथ, डॉ. देवेंद्र डे, डॉ. शेहनाज खोदाजी , डॉ. अभय भावे , डॉ . प्रंतर चकवर्ती, डॉ. परिक्षीत प्रयाग, डॉ. समीर मेर्लीनकेरी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार असणार आहेत.तसेच डॉ.एच.पी.पाटील व सचिव डॉ. मैत्रेय भट्टाचार्य तसेच प्रसिडेंट इलेक्ट डॉ.शहेनाज खोदाजी उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिमॅटॉलॉजी सोसायटीचे डॉ. कलंत्री तसेच आयएमए नाशिकचे उपाध्यक्ष डॉ. किरण शिंदे, उपाध्यक्षा डॉ. गितांजली गोंदकर, खजिनदार डॉ. माधवी गोरे – मुठाळ, वुमेन्स विंगच्या चेअरपर्सन डॉ. शलाका बागुल तसेच को चेअरपर्सन डॉ. प्रेरणा शिंदे तसेच डॉ. अस्मिता मोरे, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. सुचेता गंधे, डॉ. शितल मोगल विशेष मेहनत घेत आहे. कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यभरातून जवळपास 400 डॉक्टर्स हजेरी लावणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या