शासकीय योजनांचा आज महामेळावा

शासकीय योजनांचा आज महामेळावा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा विधीसेवा प्राधिकरण (District Legal Services Authority) व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन रविवारी सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी दिली.

या महामेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, टपाल विभाग, बँक अशा सर्व शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदविलेला आहे. या महामेळाव्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार असून विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल देखील याठिकाणी लावण्यात येणार आहेत. या महामेळाव्यात लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सचिव इंदलकर यांनी केले आहे.

या महामेळाव्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात आदी उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com