दातृत्व : किडनी, डोळे, त्वचा, लिव्हर केले दान

दातृत्व : किडनी, डोळे, त्वचा, लिव्हर केले दान
जिल्हा रुग्णालय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) मृत झालेल्या रुग्णाचे अवयवदान (Organ donation) करण्यासाठी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना यश मिळाले आहे. नातेवाईकांनी दाखविलेल्या मोठेपणामुळे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. त्यामुळे अवयवदान चळवळीला बळ मिळत आहे...

धनराज हिंडे (५०) (Dhanraj Hinde) यांचा अपघात (Accident) झाल्याने त्यांना उपचारासाठी (Treatment) गुरुवारी (दि. १८) नोव्हेंबर रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांचे ब्रेन डेड (Brain dead) झाल्याचे डॉ. प्रतीक भांगरे (Dr. Pratik Bhangre) यांना तपासणीत आढळले. याबाबत डॉ. भांगरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात (Dr. Ashok Thorat) यांना माहिती दिली.

ब्रेन डेड व्यक्तीचे अन्य अवयव इतर रुग्णांसाठी वरदान ठरू शकतात. त्यामुळे डॉ. थोरात यांनी हिंडे यांच्या नातेवाइकांना त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यांचा देह अवयव प्रत्यारोपणाकरिता दान करावा, असे आवाहन करीत अवयवदानाचे महत्त्वही समजावून सांगितले.

हिंडे यांच्या नातेवाईकांनीही एवढ्या परिस्थितीत संवेदनशीलतेने संमती देत एक मोठे पाऊल अवयवदान मोहिमेकडे टाकले. त्यानंतर झोनल टीमला याबाबत कळविल्यानंतर जिल्हा रुग्णालय आणि ऋषिकेश हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हिंडे यांचे किडनी, डोळे, त्वचा आणि लिव्हर हे अवयव काढून प्रत्यारोपणासाठी उपलब्ध करून घेण्यात आले.

नातेवाइकांनीही संवेदनशीलतेने त्यासाठी संमती दिली. त्यानंतर तत्काळ डॉ. थोरात, डॉ. निखिल सैंदाणे यांनी याबाबत झोनल टीम कमिटीला कळविले. सिव्हिल हॉस्पिटल आणि ऋषिकेश हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. उपलब्ध अवयव सह्याद्री हॉस्पिटल, सुशील आय हॉस्पिटल आणि नेहेते हॉस्पिटल या रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपणाकरिता पाठविण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com