Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याओबीसी आरक्षण सोडतीचे आदेश

ओबीसी आरक्षण सोडतीचे आदेश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

सर्वोच्च न्यायालायाने (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ( Local Body Elections ) इतर मागसवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणावर ( OBC’s Political Reservation ) शिक्कमोर्तब केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission )निवडणूक होऊ घातलेल्या महापालिकांसाठी येत्या २९ जुलैला तर जिल्हा परिषदा,पंचायत समिती आणि नगरपालिकांसाठी २८ जुलै २०२२ रोजी ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढण्याचे आदेश शुक्रवारी दिले.

- Advertisement -

त्यानुसार सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण रद्द करून ओबीसी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नव्याने सोडत काढण्यात येईल. मुंबई महापालिकेत २७ टक्के ओबीसी आरक्षणानुसार ओबीसींसाठी ६३ जागा राखीव असणार आहेत.

महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढताना यापूर्वीचे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम राहणार आहे. ओबीसी आरक्षण सोडतीची प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेशात म्हटले आहे.

याशिवाय आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २८ जुलैला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठीची आरक्षण सोडत निघेल. आरक्षणाची प्रारूप अधिसूचना २९ जुलै रोजी प्रसिद्ध करायची आहे. तर ५ ऑगस्ट २०२२ रोजी आरक्षण विहित नमुन्यात राजपत्रात प्रसिद्ध करावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

राज्यातील ११५ नगरपालिका आणि ९ नगर पंचायतींसाठी २८ जुलै रोजी ओबीसीसाठी आरक्षण सोडत काढण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित महापलिका, जिल्हा परिषदेत ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण मान्य केले आहे. मात्र समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्यावर जाणार नाही या मर्यादेत ओबीसी प्रवर्गासाठी जगा राखून ठेवाव्यात असे आयोगाने स्पष्ट केले आहे. ओबीसींसाठी आरक्षण सोडतीचा आदेश निघाल्याने पावसाळा संपल्यानंतर लगेच महापलिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु होणार आहे.

आरक्षण सोडत

महापलिका : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, कोल्हापूर,पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर

जिल्हा परिषदा : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली

- Advertisment -

ताज्या बातम्या