दिवाळीपूर्वी ‘अंधार’ मिटवा!

पथदीपांबाबत स्थायी सभापतींचे प्रशासनाला आदेश
दिवाळीपूर्वी ‘अंधार’ मिटवा!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील अनेक प्रभागांमध्ये रात्रीच्या वेळी मोठ्याप्रमाणात पथदीप बंद Streets lights राहत आहे. त्याच प्रमाणे दिवांचा प्रकाश देखील कमी पडत असल्याने मनपा प्रशासनाने त्वरीत याबाबत पाहणी करुन बंद दिवे सुरू करुन दिवाळीपूर्वी सर्व ठिकाणी दिव्यांची फिटींग करुन घ्यावी, असे आदेश मनपा स्थायी समीती NMC Standing Committeeसभापती गणेश गिते Ganesh Gite यांनी दिले.

गिते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. यावेळी त्यांनी आदेश दिले. सभेच्या सुरूवातीलाच शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. 2018 साली मनपाने टाटा कंपनीशी बिओटी बाबत करार केला. त्यानुसार 92 हजार दिवे शहरात ठिकठिकाणी लागणार आहे. मात्र दिवे अद्याप लागलेलेच नाही, असा आरोप करीत ज्या ठिकाणी दिवे लागले त्यांचा प्रकाश 6 महिन्यानंतर कमी पडत असल्याने प्रभागांमध्ये अंधार पडतो.

25 हजार पोलवर अद्याप फिटींग झाली नाही, एनर्जी सेव्हिंगच्या नावे रात्री दिवे बंद होता, असे आरोप करीत मनपाचे अधिकारी लक्ष देत नाही. मनपाला वेठीस धरण्याचा प्रकार झाल्याचे सांगितले. शहराचा वेठीस धरण्याचा अधिकार कोणाला नसल्याने याबाबत चौकशीची मागणी केली. यावर प्रशासनाच्या वतीने विद्युत विभागाचे वनमाळी यांनी उत्तर दिले. प्रभागांमध्ये दिवे बंद असल्याचा आरोप सभापतींसह मनसेनेचे सलिम शेख, काँगे्रसचे राहुल दिवे, भाजपचे मुकेश शहाणे यांनीही केला. सभापती गिते यांनी चौकशी करुन दिवाळी पूर्वीच सर्व दिवे सुरू करण्याचे आदेश दिले.

अंगणवाडी सेविकांना ओळखपत्र व गणवेश

स्थायी समितीच्या सभेत भाजपच्या प्रतिभा पवार यांनी अंगणवाडी सेविकांच्या गणवेश तसेच ओळखपत्राचा विषय उपस्थित केला. महिलांना शहरात विविध ठिकाणी जाऊन सर्वे करावे लागत आहे. काही ठिकाणी त्यांना नागरिक प्रवेश देत नाही. यामुळे त्यांना ओळखपत्र देऊन महापालिकेने गणवेश देखील द्यावेत, त्यामुळे त्यांचे काम सोपे होतील अशी मागणी केली. यावर सभापती गिते यांनी प्रशासनाने याबाबत त्वरित अहवाल तयार करून आयुक्तांच्या परवानगीसाठी सादर करावा, असे आदेश दिले.

शहरातील विविध ठिकाणी असलेल्या ओपन स्पेसमध्ये लोकांनी घाण करून ठेवली आहे. यामुळे आरोग्य धोक्यात आले असून भूखंड मालकावर दंडात्मक कारवाई करून महापालिकेने सफाई करून घ्यावी, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे महापालिकेतील विविध विभागातील झेरॉक्स मशीन सध्या बंद आहे. नगरसेवकांना ही कर्मचारी दाद देत नाही तर झेरॉक्स मशीन बंद असल्याचे कारण देत आहे. याबाबत तक्रार पवार यांनी केली. यावर सभापती गिते यांनी प्रशासनाने सर्व विभागातील झेरॉक्स मशीन त्वरित दुरुस्त करून व्यवस्थित कराव्यात, असे आदेश दिले.

टीडीआर घोटाळा संशय कायम

स्थायी समितीच्या सभेत महाराष्ट्र निर्माण सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांच्यासह इतर सदस्यांनी तसेच सभापती गिते यांनी टीडीआर घोटाळा यासंबंधी अहवाल का ठेवण्यात येत नाही, असा प्रश्न विचारला. चौकशी समिती अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने शिवसेनेचे सुधाकर बडगुजर संतप्त झाले. अहवालावर कोणाची सही बाकी असेल तर मी आणून देतो, तुम्ही अहवाल ठेवा असे, आवाहन केले.

Related Stories

No stories found.