विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी

विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी

नवी दिल्ली । New Delhi

देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential Election) रणधुमाळी सुरू असताना काल एनडीएकडून (NDA) उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल (West Bengal Governor) जगदीप धनकड (Jagdeep Dhankad) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर आज युपीएकडून (UPA) उपराष्ट्रपतीपदासाठी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे...

आज विरोधीपक्षांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष (Nationalist Congress President) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत विरोधीपक्षाने उपराष्ट्रपतीपदासाठी (Vice President) मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पवारांनी इतर नेत्यांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, मार्गारेट अल्वा यांनी राज्यपाल, खासदार आणि महाराष्ट्राच्या प्रभारी म्हणून काम केले असून त्या मूळच्या कर्नाटकातील रहिवासी आहेत. तसेच मार्गारेट अल्वा यांना काँग्रेस, डीएमके, सपा, एनसीपी, आरजेडी, शिवसेना, टीआरएस, आरएसपी, मनी काँग्रेस, एमडीएमके, सीपीआय, सीपीआयएम, जेएनएल, नॅशनल काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

कोण आहेत मार्गारेट अल्वा ?

मार्गारेट अल्वा यांचा जन्म १४ एप्रिल १९४२ रोजी कर्नाटकातील (Karnataka) मंगलोर (Mangalore) येथे झाला. त्यांनी कर्नाटकातच शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मार्गारेट काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. त्यांना काँग्रेसने (Congress) राज्यसभेवर पाठवले होते. विविध मंत्रालयांच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. काँग्रेसने त्यांना १९७५ मध्ये पक्षाचे सरचिटणीसही केले. मार्गारेट अल्वा या एकूण चार वेळा राज्यसभेच्या सदस्य राहिल्या आहेत. त्यानंतर १९९९ मध्ये त्या लोकसभेवर (Lok Sabha) निवडून आल्या. तसेच मार्गारेट अल्वा या गोवा, गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंडच्याही राज्यपाल होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com