'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी'...; विरोधक आक्रमक

'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी'...; विरोधक आक्रमक

मुंबई | Mumbai

सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचे विधानसभेचे कामकाज सुरु होण्याआधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली...

यावेळी महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aghadi) नेत्यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) बंडाचे केंद्र असलेल्या गुवाहाटीचा संदर्भ विविध घोषणा दिल्या. 'गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी, ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…, 'ईडी सरकार हाय हाय..', 'फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…' 'नही चलेगी… नही चलेगी दादागिरी नही चलेगी…', 'सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है…', ‘फिफ्टी- फिफ्टी… चलो गुवाहटी…’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आज दणाणून सोडला.

दरम्यान, याप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve ) यांच्यासह आ. छगन भुजबळ आदित्य ठाकरे, प्रणिती शिंदे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, वर्षा गायकवाड हे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com