Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण

मुंबई | Mumbai

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

त्यांनी म्हंटले आहे कि, “लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !”

फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दौरे करत होते. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही भाजपानं त्यांच्यावर सोपवलेली असल्यानं बिहारमध्येही ते सातत्यानं फिरतीवर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या