Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी

शेतकऱ्यांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ( Onion Growers Farmers ) दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव (Proposal to reduce export duty on onion)केंद्राला सादर करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी केली. यासंदर्भात पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांना पत्र पाठवले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे. मात्र कांद्यावरील निर्यात शुल्काचा दर जास्त असल्यामुळे कांद्याच्या निर्यातीला मर्यादा येत आहेत. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक अडचणीत आला असून मागील वर्षी ६८ टक्क्यांवर असणारी कांद्याची निर्यात यावर्षी अवघी ८ टक्क्यांवर आली आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्राकडे पाठवून तो मंजूर करुन घ्यावा, अशी मागणी पवार यांनी पत्रात केली आहे.

राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतात. कांद्याला योग्य दर मिळाला तर शेतकऱ्यांना कांद्याचे उत्पादन परवडते. मात्र कांद्यावरील निर्यात शुल्काचा दर जास्त असल्यामुळे कांदा निर्यातीला मर्यादा येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. निर्यात शुल्काचा दर जास्त असल्यामुळे कांदा निर्यातीचे प्रमाण घटले आहे. राज्य सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठविणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारकडून अद्यापी प्राप्त झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्याकडे पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या