राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची वज्रमूठ

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची वज्रमूठ

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून ( Election of President ) विरोधकांमध्ये खल सुरु आहे. विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे होते. या बैठकीला काँग्रेस, शिवसेनेसह 16 पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून पवारांचेच नाव पुढे करण्यावर सहमत झाले. मात्र पवारांनी यासाठी नकार दिला आहे. यामुळे अन्य उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली.या बैठकीत विरोधकांकडून एक उमेदवार करण्याबाबत चर्चा झाली.

या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी की, विरोधकांच्या या बैठकीत प्रत्येक पक्षाने आपापली मते मांडली. त्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वांच्या सहमतीने एकच उमेदवार उभा करण्याबाबत ठराव मांडण्यात आला. मोदी सरकारकडून लोकशाहीला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न होतोय तो रोखण्यासाठी एक मजबूत उमेदवार उभा केला जाईल असे सांगण्यात आले.

तसेच जे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्याशी 1-2 दिवसांत वैयक्तिक संवाद साधला जाईल. त्यांना आजच्या बैठकीत जे काही ठराव झाले तेसांगण्यात येतील असेही पवारांनी सांगितले.प. बंगालच्या मुख्ममंत्री ममता बॅनर्जी मांनी सांगितले की, जर शरद पवारांनी स्वत: आपल्या नावावर शिक्कामोर्तब केले तर चांगले होईल, अन्यथा आम्ही संयुक्त उमेदवाराच्या नावावर विचार करू. विरोधकांच्या बैठकीत शरद पवार मांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभे राहण्यावर आग्रह करण्यात आला. मात्र, पवारांनी तेव्हाच नकार दिला.

यानंतर ममता यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्ममंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली. परंतू, उमर अब्दुल्ला यांनी त्यास विरोध केला. सुत्रांनुसार ममता यांनी दोन नेत्यांची नावे सुचविली.या यामध्ये गोपाळ कृष्ण गांधी आणि दुसरे नाव अब्दुल्ला यांचे होते. याशिवाय एन के प्रेमचंद्रन यांच्या नावावरही चर्चा करण्यात आली.

बैठकीला अनेक पक्ष आले होते.आम्ही सर्वानुमते उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्ष या उमेदवाराला आपले समर्थन देतील.यावर आम्ही चर्चाही करू. ही एक चांगली सुरुवात आहे. आम्ही अनेक महिन्यांनी एकत्र आलो होतो, पुन्हा एकत्र येऊन चर्चा करू, असे ममता म्हणाल्या. आठवडाभरात दुसरी बैठक घेण्याचे ठरले आहे. या बैठकीत संयुक्त उमेदवाराचे नाव निवडले जाऊ शकते. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी पवार, ममता आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर देण्यात आली आहे.

या बैठकीला माजी पंतप्रधान देवगौडा, मल्लिकार्जून खरगे( काँग्रेस), अखिलेश यादव ( उत्तर प्रदेश), मेहबुबा मुफ्ती( काश्मीर), सुभाष देसाई( महाराष्ट्र), ई करीम( केरळ), जयराम रमेश( काँग्रेस), प्रफुल्ल पटेल( राष्ट्रवादी), टी. आर. बालू( तामिळनाडू), यशवंत सिन्हा( बिहार), रणदीप सुरजेवाला( काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी( शिवसेना), उमर अब्दुल्ला( नॅशनल कॉन्फरन्स), राजा ( तामिळनाडू) आदी 18 नेते उपस्थित होते.

पवारांसाठी शिवसेनेचा आग्रह

केवळ राष्ट्रपती निवडीसाठी नव्हे तर सर्व विरोधी पक्षांनी एकजूट मजबूत केली पाहीजे. शरद पवार यांनी ही निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांचा नकार कायम राहिल्यास सर्वसामान्य, उज्वल प्रतिमेचा शक्य झाल्यास राजकीय परिघाबाहेरचा उमेदवार निवडावा, हे देशासाठी प्रतिष्ठेचे पद आहे म्हणून ही निवडणूक महत्वाची असल्याची भूमिका शिवसेना नेते तसेच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केली.भाजपने घटनेची चौकट मोडण्यास सुरुवात केली आहे. देशाने 75 वर्षांत जपलेली मूल्ये पायदळी तुडवली आहेत. संविधानिक यंत्रणांचा गैरवापर चालवला आहे. अशावेळी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपतीपदासाठी एकमुखाने उमेदवार ठरवावा व निवडून आणावा.भाजप विरोधातील पक्षांना एकत्र आणण्याची सुरुवात महाराष्ट्राने केली. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी ही सुरुवात केली, असे देसाई म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com