गुन्हेगार सुधारणा योजनेस प्रारंभ

विभाग 3, 4 मधील 115 गुन्हेगारांना अभय
गुन्हेगार सुधारणा योजनेस प्रारंभ

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 विभाग 3 व 4 मधील गुन्हेगार सुधारणा योजनेअंतर्गत सुमारे 115 जणांना सुधारण्याकरिता पोलीस आयुक्तांंतर्फे अभय देण्यात आले.

अंबड औद्योगिक वसाहतीत आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचेसह उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, सहाय्यक आयुक्त समीर शेख, सहाय्यक आयुक्त गुन्हे नवलनाथ तांबे, अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी, सातपुर पोलीस ठाण्याचे वपोनी किशोर मोरे, निलेश माईनकर, उपनगर पोलीस ठाण्याचे अनिल शिंदे, नाशिकरोडचे सूरजकुमार बिजली, देवळाली कॅम्पचे कमलाकर जाधव यांनी मार्गदर्शन करत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सुधारण्याकरिता संधी दिली.

यावेळी बोलताना आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले की,गुन्हा दोन प्रकारे घडतो भावनिकतेणे झालेला गुन्हा थांबवणे शक्य नाही तर दुसरा म्हणजे नियोजीत झालेला गुन्हात संघटित गुन्हेगारीचा समावेश होतो. नाशिक शहरातील संघटित गुन्हेगारी पूर्णतः संपविण्याकरिता रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सुधारण्याकरिता संधी दिली जात आहे.यावेळी रेकॉर्डवरील काही गुन्हेगारांनी देखील आपले मत व्यक्त केले. प्रामुख्याने संगतगुन व व्यसन हाच प्रामुख्याने गुन्हेगारी करण्यास कारणीभूत ठरतो असे मत सराईतांनी व्यक्त केले.

या ठिकाणी विभाग 3 मधील 51 हून अधिक तर विभाग 4 मधील 64 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सुधारण्यासाठी त्यांच्याकडून बाँड पेपर लिहून घेण्यात आला. तसेच उद्योजक विकास केंद्रातर्फे शासनाच्या विविध योजना व औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी त्यांना विविध क्षेत्रातील प्रशिक्षण या संदर्भात माहिती देण्यात आली.

यावेळी गुन्हे शाखा युनिट 2 चे वपोनी अजय शिंदे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर,तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी संजय भामरे मानसोपचार तज्ञ डॉ हेमंत सोननीस यांच्यासह अधिकारी व पोलीस सेवक उपस्थित होते.

पोलीस ठाणेनिहाय अभय मिळालेले गुन्हेगार

नाशिकरोड- 26

देवळाली कॅम्प- 18

उपनगर- 20

अंबड- 20

सातपूर- 14

इंदिरानगर- 17

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com