मतदार यादीत नावनोंदणी, दुरुस्तीची संधी

मतदार यादीत नावनोंदणी, दुरुस्तीची संधी

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी Upcoming of local body elections निवडणुकांच्या दृष्टीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत Voters list नावे नोंदविण्याची आणि मृत, दुबार अथवा स्थलांतरीतांची नावे वगळण्याची चांगली संधी आहे.

त्याबाबत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी समन्वयाने व्यापक, प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान State Election Commissioner U. P. S. Madan यांनी दिले.

भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणार्‍या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत मदान यांनी आज जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संवाद साधला.

भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदारसंघांचीच मतदार यादी महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणार्‍या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावित.

त्याचबरोबर मृत, दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील, असे मदान यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.