Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामार्गारेट अल्वा यांनी उपराष्ट्रपती पदासाठी दाखल केला अर्ज

मार्गारेट अल्वा यांनी उपराष्ट्रपती पदासाठी दाखल केला अर्ज

दिल्ली | Delhi

भारताच्या नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी (Vice President Election) नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संयुक्त उमेदवार म्हणून उभे केले आहे.

मार्गारेट अल्वा यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी, संजय राऊत आणि इतर विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड यांनी सोमवारी संसदेत लोकसभेच्या सचिवालय कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या