Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकस्मशानभूमी अभावी उघड्यावरच अंतिम संस्कार; 'वाचा' मन हेलावून टाकणारी घटना

स्मशानभूमी अभावी उघड्यावरच अंतिम संस्कार; ‘वाचा’ मन हेलावून टाकणारी घटना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तालुक्यातील शेवटचे टोक गुजरात सीमेपासून अवघ्या दहा ते वीस फुटावर असलेले चंद्रपूरची बागुल वस्ती या वस्तीवर दोन दिवसांपूर्वी मोतीराम बागुल वय अंदाजे तीस ते बत्तीस वर्षे यांचे आकस्मिक निधन झाले…

- Advertisement -

त्या दिवशी पावसाची (Rain) संततधार सुरु होती. सुरगाणा (Surgana) येथून शवविच्छेदन करुन मृतदेह गावी आणल्यावर धो धो पावसात अंतिम संस्कार करायचे कसे हा यक्षप्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला.

शवविच्छेदन झालेले प्रेत घरी ठेवता येत नव्हते.अखेर काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता..भरपावसात स्मशानाकडे चल माझ्या प्रेता असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

असे म्हटले जाते की, कोणत्याही गोष्टीचा अनुभव तेव्हाच येतो. “जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे.स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या ओळी खुप काही सांगून जातात.

प्रत्यक्ष अडचणीचा सामना करते वेळी मयताच्या नातेवाईकांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. स्मशानात भूमी पर्यंत जाणे साठी रस्ता नसल्याने खांदेकरी यांना प्रेत घेऊन चालता येत नाही. चिखलातून, भातशेती मधून, बांधावरुन प्रेत घेऊन जावे लागते. कसेबसे हाल अपेष्टा सहन करीत स्मशानात पोहचल्यावर तेथे उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागतात.

राज्यात मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?

पाऊस जास्त असेल तर मीठ तसेच पेट्रोल किंवा डिझेलचा वापर करुन ही प्रेत पेटत नाही. अखेर सागवान पानाची पलान शिवून चित्तेवर ठेवत अग्नी डाग देण्यात आला. त्यामुळे चिता पटविण्यासाठी सागवान पानांचा आधार घ्यावा लागला.

दहशतवादी याकुबच्या कबरीवरील एलईडी काढल्या; मुंबई पोलिसांची कारवाई

तालुक्यात ठराविक गावातच स्मशानभूमी शेड आहेत. अनेक गावांना उघड्यावरच अंतिम संस्कार केले जातात. चंद्रपूर गावची लोकसंख्या तेराशे ते दीड हजारांच्या आसपास आहे. ग्रामपंचायतीने तात्काळ शेड उभारण्याची मागणी जोतिंग बागुल, कमलेश बागुल, नितेश बागुल, रमण राऊत, दिनेश चौधरी, दौलत महाले, विनेश राऊत, गोपाळ चौधरी, फिलीप गावित, मनु चौधरी, जयराम पवार, जयेश बागुल, काशीराम बागुल, अजय बागुल यांनी केली आहे.

याकुब मेमन कबर सजावटीवरून भाजप आक्रमक; उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

माझ्या मुलाचे आकस्मिक निधन झाले होते. स्मशानभूमी शेड तसेच रस्ता नसल्याने खुप हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. हे उघड्या डोळ्यांनी पाहतांना खूपच यातना सहन कराव्या लागल्या. पुन्ग्राहा अशी वेळ येऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेऊन स्मशानभूमी शेड उभारावे.

गबु बागुल. मयताचे वडील.

- Advertisment -

ताज्या बातम्या