पुढील महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार कारण…

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली

पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढीमुळे (Petrol Diesel Price) सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. परंतु केंद्र व राज्य सरकार आपले कर कमी करण्यास तयार नाही. या परिस्थितीत आता पुढील महिन्यात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. कारण ओपेक प्लस (OPEC) देशांनी ऑगस्ट महिन्यापासून तेलाचे उत्पादन (Oil Production) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दर कमी होण्याची शक्यता आहे.

…यामुळे नाशिक-पुणे प्रवास होणार सुखकर

ओपेक (OPEC)प्लस देशांच्या मंत्र्यांनी रविवारी बैठक झाली. या बैठकीत ऑगस्ट महिन्यापासून तेल पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.या बैठकीत ओपेक देशांशिवाय रशियासारख्या इतर देशांनीही सहभाग घेतला होता. गेल्या वर्षी ओपेक प्लस देशांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रोज 10 मिलियन बॅरल्स उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर यात हळूहळू वाढही करण्यात आली. मात्र, अद्यापही यात रोज 5.8 मिलियन बॅरलची कपात दिसत आहे. ओपेक प्लस देश एकत्रितपणे दर महिन्याला रोजच्यारोज 4 लाख बॅरल उत्पादन वाढवतील. सप्टेंबर महिन्यात दिवसाला 8 लाख बॅरल एवढे उत्पादन वाढेल. याप्रमाणे, ऑक्टोबर महिन्यात रोज 12 लाख बॅरल, नोव्हेंबर महिन्यात रोज 16 लाख बॅरल तर डिसेंबर महिन्यात रोज 20 लाख बॅरलपर्यंत उत्पादन वाढेल. आज युएई आणि सौदी अरेबिया यांच्या सहमतीनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, उत्पादन वाढविण्याची संधी सर्वच देशांना देण्यात आली आहे.

कोरोनानंतर जागतिक अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा होताना दिसत आहे. यामुळे तेलाची मागणीही वाढली आहे. मात्र, उत्पादनाची मर्यादा असल्याने सद्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत अडीच वर्षांच्या तुलनेत सर्वोच्च स्थरावर जाऊन पोहोचली आहे. या आठवड्यात कच्च्या तेलाचा क्लोजिंग दर 73.14 डॉलर प्रति बॅरल होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *