सावधान : रेल्वे प्रवासासाठी आता हा नियम सक्तीचा

रेल्वे
रेल्वे

झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने (Southern Railway) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता रेल्वेत प्रवास करण्यासंदर्भात निर्बंध आणण्यात आले आहे. आता ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस ( two doses of vaccination)घेतले आहेत, तेच लोक 10 जानेवारीनंतर ट्रेनमधून प्रवास करु शकतात. दक्षिण रेल्वेने (Southern Railway)हा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत अशी मार्गदर्शक तत्त्वे केवळ दक्षिण रेल्वेनेच जारी केली आहेत.

रेल्वे
रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

दक्षिण रेल्वेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले नाहीत किंवा ज्या लोकांचा कोरोनाचा एकच डोस झाला आहे, त्यांना ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. रेल्वेच्या आवारात मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना 500 रुपये दंडही भरावा लागणार आहे. तामिळनाडूमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता तेथील रेल्वे विभागाने ६ जानेवारी रोजी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com