Friday, May 10, 2024
Homeदेश विदेशपंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; आमदारांना आता....

पंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; आमदारांना आता….

दिल्ली | Delhi

पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) दणदणीत विजयानंतर आम आदमी पार्टीने (AAP) मोठ-मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

पंजाबमध्ये ३५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार असल्याची घोषणा पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी मंगळवारी केली.

त्यानंतर, आता माजी आमदारांना केवळ एकच टर्मची पेन्शन देण्यात येणार असल्याचा निर्णयही पंजाब सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज याची घोषणा केली. म्हणजेच आमदाराने कितीही वेळा निवडणूक जिंकली तरी त्याला एका टर्मचंच निवृत्ती वेतन मिळणार आहे. सोबतच अनेक आमदारांच्या कुटुंबाचं निवृत्ती वेतनही कमी केलं जाणार आहे.

एकीकडे महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या भत्तेमध्ये वाढ केली आहे. तर पंजाबमध्ये माजी मंत्र्यांच्या पेन्शनमध्ये घट केली आहे. त्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या